Accident News: जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू !

या घटनेने मंगळवेढ्यात व्यापारी वर्गात शोककळा पसरली | This incident caused mourning among the business class on Tuesday
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू  !
Accident News: sakal

जागतिक सायकल दिनानिमित्त मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला-मंगळवेढा ही केलेली सायकल वारी जीवावर घेतली असून मंगळवेढ्यातील तरुण उद्योजक सुहास ताड याचा सांगोला जवळ पहाटेच्या दरम्यान झालेल्या अपघातात आपला जीव गमावा लागला.

रोज सायकल चालवा आणि निरोगी रहा हा संदेश घेऊन मंगळवेढ्यातील काही तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी सायकलवारी केली त्या प्रत्येक सायकल वारीत सुहास ताड या उद्योजकाचा सहभाग असायचा तर काही तरुणांना तो सायकल वारीसाठी प्रोत्साहित देखील करत असे.

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू  !
Porsche Car Accident : ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश

जागतिक सायकल दिनाच्या अनुषंगाने काल मंगळवेढा -सांगोला- पंढरपूर -मंगळवेढा हा सायकलवर प्रवास केल्यानंतर जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलवारी करण्यासंदर्भात काल रात्री त्यांच्या इतर मित्रांबरोबर व्हाट्सअप चॅटिंग देखील झाले होते मात्र इतर दोन मित्र पहाटे लवकर न उठल्यामुळे सुहास ताड हे एकमेव सायकलवारीसाठी पंढरपूर मार्गे निघाले.

सायकलवरून जात असताना सांगोला येथे भरधाव वाहनाने सायकला जोराची धडक दिल्यानंतर जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांनी खिशात असलेल्या लायसन वरून संपर्क नातेवाईकांना याची कल्पना दिली. या घटनेने मंगळवेढ्यात व्यापारी वर्गात शोककाळ पसली.

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू  !
Dombivli Accident : दुबईला जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; डंपर खाली आल्याने डोंबिवलीत महिलेचा मृत्यू

गतवर्षी खटावकर मॉल जळून खाक झाला त्यामध्ये हे सुहास ताड हे भागीदार होते, शितल कलेक्शन या कापड व्यवसाय देखील आपले नाव कमावले होते यापूर्वी त्यांनी मंगळवेढा ते बानुरगड, मंगळवेढा ते रायगड, मंगळवेढा ते तुळजापूर ही सायकलवारी केली आहे.

सातत्याने सायकल चालवणे हा त्याचा छंद होता त्याच्या निमित्ताने अनेक तरुण सायकल वारीला तयार होत असे परंतु या सायकलवारीचा मोरक्या आज अपघातात बळी पडला गतवर्षी सायकल दिनाच्या निमित्ताने मंगळवेढ्यातील महामार्गावर चंद्रकांत सोनगे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता.

Accident

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू  !
Pune Porsche Accident: "मी नशेत होतो, मला काहीच आठवत नाही," पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीने पुणे पोलिसांनना काय काय सांगितले?

यंदा ही दुसरी घटना घडली आहे त्यामुळे महामार्गावरून सायकल चालवणे सध्या धोक्याचे बनत चालल्याचे स्पष्ट झाले. आरोग्यासाठी सायकल चालणे फायदेशीर असले तरी सायकल वारीसाठी निवडलेला मार्ग मात्र धोकादायक बनत चालला.

सध्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठी रहदारी असते अशात वाहतूक वाढली असल्याने सायकलिंग करणे हे राष्ट्रीय महामार्गावरून जाणे धोकादायक झाले यासाठी सायकल स्वरांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल घेवून निघाला अन् तरुण उद्योजकाचा मृत्यू  !
Pune Accident : अष्टापुर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; बाप लेकासह तीघांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com