घर बसल्या मिळवा व्यवसाय परवाने, `या` महापालिकेने केली सुविधा 

घर बसल्या मिळवा व्यवसाय परवाने, `या` महापालिकेने केली सुविधा 


सोलापूर :  शहरातील उद्योजकांना आपल्या व्यवसाय व उद्योगासाठी लागणारा महापालिकेचा परवाना आता घरबसल्या मिळवता येईल. महापालिकेतील परवाना विभाग आता ऑनलाइन करण्यात आला असून, तो कार्यान्वित झाला आहे. 

महापालिकेच्या  www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 
महापालिका आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या 155 व्यवसायांच्या परवाना शुल्कात 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार परवाने देतानाच ते ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.  एप्रिल ते मार्च असा परवान्यांचा कालावधी असणार आहे. 


अधिनियमातील तरतुदीनुसार दरवर्षी मार्चमध्ये परवाने दिले जातात, तसेच मार्चमध्ये नूतनीकरणही करून दिले जाते. अन्न सुरक्षा व मानके कायदा अस्तित्वात आल्यापासून भेसळ प्रतिबंधक व आरोग्य परवानाविषयक कामकाज महापालिकेकडून काढून घेण्यात आले. त्यामुळे या परवान्यांपासून महापालिकेस मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या तब्बल नवीन 52 व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शुल्क आकारल्यास महापालिकेस वर्षाला अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 


परवाना शुल्कात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. गतवर्षी 2013-14 या आर्थिक वर्षात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार आता वाढ करणे आवश्‍यक असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 2017-18 या आर्थिक वर्षापासून सध्याच्या दरात 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ लागू झाल्यास परवाना शुल्काचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच किमान सव्वापाच लाख रुपयांचे जादा उत्पन्न पालिकेस मिळणार असून, ही रक्कम 21 ते 24 लाखांपर्यंत जाणार आहे. 2020-21 साठीचे शुल्क फरकासह भरावे लागणार आहे. 

आकडे बोलतात... 
परवानापात्र व्यवसाय ः 155 
सोलापुरातील संख्या ः अंदाजे 6964 
सध्याचे उत्पन्न ः अंदाजे 16.30 लाख 
मिळणारे उत्पन्न ः अंदाजे 25.10 लाख 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com