esakal | कारखानदारांना राज्य बॅंकेनी भरला दम.... येणेबाकी भरण्याची करुन दिली आठवण 
sakal

बोलून बातमी शोधा

sugarfactory.
  • 25 बॅंकांकडे साडेनऊ हजार कोटी थकले 
  • 41 साखर कारखान्यांकडेही चार हजार कोटी 
  • मुदतीत कर्ज न फेडणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई 
  • कर्जमाफीच्या रकमेतून जिल्हा बॅंका परतफेड करणार राज्य बॅंकेची थकबाकी 

कारखानदारांना राज्य बॅंकेनी भरला दम.... येणेबाकी भरण्याची करुन दिली आठवण 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सततचा दुष्काळ, अवकाळी अन्‌ गारपीट, महापूर अशा नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला बॅंकांची थकबाकी भरणे मुश्‍किल झाले. थकबाकी वाढल्याने ठप्प झालेले कर्जवाटप सुरळीत करण्याच्या हेतूने राज्यातील 25 जिल्हा बॅंकांना राज्य बॅंक व नाबार्डच्या माध्यमातून 11 हजार 400 कोटींचे कर्ज दिले. मात्र, त्यापैकी नऊ हजार 546 कोटी 24 लाख रुपयांची जिल्हा बॅंकांकडून परतफेड झालेली नाही. तर 41 कारखान्यांकडे स्वॉप्ट लोन व प्लेज लोनचे चार हजार 237 कोटी थकले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : सोलापुरसाठी आनंददायी ! उजनीतून सोडले सोलापुरसाठी पाणी 


मागच्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ महापुरामुळे राज्यातील उसाचे क्षेत्र घटले आणि कारखान्यांसमोरील अडचणीत वाढ झाली. त्यातच साखरेला उठाव नसल्याने आणि साखर निर्यातीवरील निर्बंधांमुळे कारखानदारांना एफआरपी देणेही मुश्‍किल झाले. या पार्श्‍वभूमीवर 41 कारखानदारांना राज्य बॅंकेने स्वॉप्ट लोन व प्लेज लोन मंजूर केले. 90 दिवसांत त्याची परतफेड करणे अनिवार्य असतानाही या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. सद्यस्थितीत 41 कारखान्यांकडे प्लेज लोनचे 507 कोटी 91 लाखांची तर प्लेज लोनची तीन हजार 730 कोटींची थकबाकी झाली आहे. आता या कारखानदारांना राज्य बॅंकेने मुदतीत कर्ज परतफेड करण्याच्या सूचना केल्या असून मुदतीत कर्ज न भरणाऱ्यांवर जप्तीच्या कारवाईचा इशाराही दिला आहे. 


हेही नक्‍की वाचा : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज...ठाकरे सरकारचे मोदी सरकारला पत्र 


कर्जमाफीतून खरीप कर्जवाटपाचा मार्ग मोकळा 
कर्जमुक्‍ती योजनेतून राज्यातील जिल्हा बॅंकांना सुमारे 19 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. आता सोलापूर, नाशिक, नांदेड, अमरावती, गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद, रत्नागिरी, परभणी, भंडारा, गोंदिया, धुळे-नंदूरबार, बुलढाणा या जिल्हा बॅंका खरीपात बळीराजाला पूर्ण क्षमतेने कर्जवाटप करणार आहेत. 

हेही नक्‍की वाचा : शिक्षकांची नाराजी, नको रे बाबा ! 

राज्याची सद्यस्थिती 
25 जिल्हा बॅंकांकडील येणेबाकी 
9,546.24 कोटी 
41 कारखाने 
प्लेज लोनची येणेबाकी 
3730 कोटी 
स्वॉप्ट लोनची येणेबाकी 
507.91 कोटी 


हेही नक्‍की वाचा : थेट सरपंच निवड रद्दचा अध्यादेशच नाही ! निवडणुकीची प्रक्रिय पूर्वीप्रमाणेच 

कारखान्यांवर जप्तीची कारवाई
राज्यातील 25 जिल्हा बॅंकांना 2019-20 साठी आठ हजार 205 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. त्यातून पाच हजार 307 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले असून सद्यस्थितीत चार हजार 322 कोटींची येणेबाकी या जिल्हा बॅंकांकडे आहे. नाबार्डचीही दोन हजार 156 कोटींची येणेबाकी आहे. तसेच 41 कारखान्यांकडे स्वॉप्ट लोनचे 508 कोटी तर प्लेज लोनची तीन हजार 730 कोटींची येणेबाकी आहे. मुदतीत कर्जाची परतफेड न करणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 
- डॉ. ए. आर. देशमुख, एमडी, राज्य बॅंक 

हेही वाचा : प्रेमात धोका ! मित्राच्या साथीने दहा जणांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

loading image