Spiritual Devotion: मणक्याच्या असह्य वेदनांवर भक्तीचा विजय! ७७ वर्षीय नीला देशमुख यांचे ५ तास उभे राहून ज्ञानेश्वरी पारायण; देह हरला, भक्ती जिंकली..

Faith over physical pain inspirational story from Solapur: मणक्याच्या असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करून ७७ वर्षीय नीला देशमुख यांचे ५ तास उभे राहून अखंड ज्ञानेश्वरी पारायण; भक्तीसमोर देहाच्या मर्यादा क्षुल्लक ठरल्या
Body Gave Up, Devotion Won: Elderly Devotee’s Inspiring Five-Hour Spiritual Journey

Body Gave Up, Devotion Won: Elderly Devotee’s Inspiring Five-Hour Spiritual Journey

sakal

Updated on

सोलापूर: देहाच्या मर्यादांपेक्षा भक्तीची शक्ती नक्कीच मोठी असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मणक्याच्या असह्य वेदनेने शरीराची लाहीलाही होत असताना, केवळ माऊलींच्या सेवेच्या ध्यासाने ७७ वर्षीय नीला देशमुख यांनी चक्क ५ तास कमरेला पट्टा बांधून उभे राहून ज्ञानेश्वरीचे पारायण केले. वेदनेच्या कळा सोसून त्यांनी मांडलेला हा ''भक्तीचा वस्तुपाठ'' भाविकाच्या काळजाला हात घालणारा ठरला. जामगुंडी मंगल कार्यालयात १५ व्या व १६ व्या अध्यायातील ४४ श्लोक आणि १०७६ ओव्यांचे पारायण करताना, त्यांच्या चेहऱ्यावर केवळ माऊलींचे स्मरण होते. साक्षात ''वेदना''ही त्यांच्या भक्तीपुढे नतमस्तक होऊन थबकल्याचे मंगळवारी पहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com