
सोलापूर : बोगस ग्रामसभा दाखवून बार व परमीट रूमसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी येणकी (ता. मोहोळ) ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी एन. व्ही काशीद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही कारवाई केली आहे. तर सरपंच पोपट जाधव यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे.