
टेंभुर्णी: अघोरी कृत्याने भक्तांना आकर्षित करणारा अरण (ता. माढा) येथील अघोरी बाबा राहुल रामचंद्र शिंदे (वय ३१) याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पूजा हवनच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल करत होता. त्याच्या ताब्यातून काळे तीळ, काळ्या बाहुल्या असे साहित्य जप्त करण्यात आले.