

Cyber alert on smartphones showing fake WhatsApp messages with malicious APK files disguised as invitations.
sakal
सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या व्हॉट्सॲपवरुन रविवारी (ता. २२) त्यांच्या संपर्कातील शेकडो लोकांना लग्नाच्या आमंत्रणाचा मेसेज आला. सर्वांना वाटले साहेबांच्या घरात कोणाचा तरी विवाह असेल. मात्र, सायबर गुन्हेगारांनी पाठविलेला मेसेज व त्याखालील ‘एपीके’ फाईल शिक्षणाधिकाऱ्यांनी डाऊनलोड केल्याने तो बनावट मेसेज त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच गेला होता. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी सर्वांना सावध केले.