

Blood Relations Tarnished: Nephew Arrested After Uncle Dies During Treatment
sakal
वैराग : बार्शी तालुक्यातील मानेगाव (धा.) येथे जुन्या घराच्या वादातून पुतण्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून, संशयित आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.