

A Home Turned Silent: Mass Murder Leaves Entire Family Grieving Irreparable Loss
sakal
सोलापूर: कर्नाटक- महाराष्ट्र सीमा भागातील गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील सामूहिक हत्याकांडाने सीमा भागाला हादरवून सोडले असून, चडचणमधील प्रतिष्ठित निराळे कुटुंबाचा अवघा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला. एकत्र कुटुंबपद्धती जपणाऱ्या या कुटुंबातील तीन सख्खे भाऊ आणि दोन तरुण मुलांचा निर्घृण हल्ल्यात मृत्यू झाला. एकूण नऊ पुरुष मंडळी असलेल्या या मोठ्या व प्रतिष्ठित कुटुंबातील तिघा भावांसह दोन मुलांचा खून झाल्याने एक भाऊ आणि तीन मुले राहिली आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.