
German Shepherd ‘Maya’, the loyal bomb detection dog of the Bomb Squad, laid to rest with state honours.
Sakal
सोलापूर : शहर पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकातील जर्मन शेफर्ड जातीच्या माया या श्वानाचे शुक्रवारी (ता. १९) आजाराने निधन झाले. शासकीय इतमामात शहर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालयासमोरील मोकळ्या मैदानात मायावर अंत्यविधी केला. यावेळी हवेत फायरिंग करून तिला सलामी देण्यात आली.