Farming Success Story : 'अवघ्या ५५ गुंठ्यात २३ लाखांचे डाळिंब'; व्होळे येथील सुधाकर चोपडेंनी कष्टातून फुलवली शेती, बांगलादेशात निर्यात
Farmer Earns ₹23 Lakh from 55 Gunthas of Pomegranate in Vhole : झाडांची लागवड बारा बाय आठ फुटांवर केली आहे. त्यांनी डिसेंबर महिन्यात शेणखत, गांडूळ खत, तागाची कुट्टी करून प्रत्येक झाडास चार किलोप्रमाणे एक डोस दिला. जानेवारीमध्ये छाटणीनंतर सुपर पावडर, पॉली सल्फेट व सूक्ष्म अन्नद्रव्य याचा डोस दिला.
Vhole farmer Sudhakar Chopde harvested pomegranates worth ₹23 lakh from 55 gunthas, exported to Bangladesh.”esakal
लऊळ : व्होळे खु. (ता. माढा) येथील ४३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने ५५ गुंठे क्षेत्रात डाळिंबाच्या बागेतून सात महिन्यांत २३ लाखांचे उत्पन्न घेऊन उत्पादित केलेला माल बांगलादेश येथे पाठवला. सुधाकर अर्जुन चोपडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते पदवीधर आहेत.