

Over 78,000 farmers in Solapur await approval of their Farmer IDs, halting much-needed heavy-rain compensation.
Sakal
सोलापूर : फार्मर आयडी असेल तरच शेतकऱ्यांना अतिवृष्टी वा महापुराची भरपाई देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे मदत मंजूर झाली असूनही फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे आयडी काढण्यासाठी बाधित शेतकरी आणि स्थानिक महसूल प्रशासनाने कमालीची घाई करत आहेत. जिल्ह्यातील जवळपास ७८ हजारांहून अधिक फार्मर आयडी सध्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.