Solapur News: शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, चौकात बसून रास्ता रोको आंदोलन; मार्ग रद्द करण्याची मागणी
Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आज शेतकऱ्यांकडून मोहोळ येथील शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महामार्ग बंद करण्याची मागणी करण्यात आली.
मोहोळ : शेतकऱ्यांची मागणी नसताना लादलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार ता 1 जुलै रोजी "मोहोळ तालुका शक्तीपीठ बाधित शेतकरी संघर्ष समिती"च्या वतीने मोहोळ येथील शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला.