

Uddhav Thackeray addressing a gathering in Ghari, Barshi — criticizes government for ignoring farmers’ distress.
Sakal
पांगरी: शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय आणि योग्य भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. नुकसानीची भरपाई देण्यासाठी आश्वासनांचीच खैरात केली जात आहे. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे, हे दगाबाज सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.