Solapur News: 'उजनीतून पाणी सोडूनही ८६ तलाव अंशतः भरले'; उजनी कालव्यातून तलाव भरून घेणे आवश्यक

सध्या पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देण्याची गरज नाही. परंतु, उन्हाळ्यामध्ये तलावांतील पाण्यामुळे विंधन विहिरी, विहिरींची पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सीना- माढा उपसा सिंचन योजना, उजनी धरणाच्या कालव्यातून पाझर तलाव भरून घेण्याची आवश्यकता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
86 Tanks Still Partially Filled Even After Ujani Water Release

86 Tanks Still Partially Filled Even After Ujani Water Release

Sakal

Updated on

माढा : उजनी धरणातून तीनवेळा भीमा नदीत पाणी सोडूनही माढा तालुक्यातील पाझर तलाव ६० ते ७० टक्केच्या आसपास भरले आहेत. दरवर्षी सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून तालुक्यातील अनेक पाझर तलाव भरले जातात. परंतु, यावर्षी संपूर्ण क्षमतेने न भरल्याने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com