Solapur Farmers : सरकारविरोधात दूध उत्पादक आक्रमक; शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून धोरणांचा केला निषेध

शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
Farmers Protest Against Government
Farmers Protest Against Governmentesakal
Summary

राज्यातील दूध व्यवसाय हा खासगी संघांच्या ताब्यात गेला असून त्यांच्या नफेखोर धोरणामुळे शेतकरी लुटला जात आहे.

उ. सोलापूर : राज्यातील खासगी व सहकारी संघांनी गाईच्या दूध (Cow Milk) खरेदी दरात सुरू केलेली कपात तत्काळ रद्द करावी. गाईच्या दुधाला शासनाने (Maharashtra Government) जाहीर केलेला हमी दर द्यावा या मागणीसाठी रविवारी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी शेतकऱ्यांनी (Farmer) रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात खासगी व सहकारी संघाकडून साखळी करून दूध उत्पादकाला लुटले जात असल्याचे भावना व्यक्त केली.

Farmers Protest Against Government
ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखणार; राजू शेट्टींचा कारखान्यांना कडक इशारा

यावेळी उ. सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ कळमण, रानमसले, मिरज परिसरातील दूध उत्पादक आंदोलनाला उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहनांच्या रांगा सुमारे एक किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या. यावेळी निषेध म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुधाचे कँड रिकामे केले.

आंदोलनाच्या वेळी सोलापूर पोलिस स्थानकाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी भास्कर बारस्कर, श्रीराम देशमुख, रवी देशमुख, शंभू पाटील, पांडू जाधव, हामु साठे, सागर चिकने, दीपक कदम, आदेश ननावरे, प्रफुल्ल कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Farmers Protest Against Government
Lek Ladki Yojana : 'लेक लाडकी' आता नव्या स्वरूपात; शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत

राज्यातील दूध व्यवसाय हा खासगी संघांच्या ताब्यात गेला असून त्यांच्या नफेखोर धोरणामुळे शेतकरी लुटला जात आहे. सरकारचे कुठलेही नियंत्रण त्यांच्यावर नाही. त्याचबरोबर दूध उत्पादकाला न्याय द्यावा अशी ही भूमिका सरकारची दिसत नाही. शासनाने दुधाला रास्त भाव देण्यासाठी तत्काळ कायदा करावा.

-दयानंद देशमुख, दूध उत्पादक, बीबीदारफळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com