

Sugarcane Farmers Demand Immediate Clearance of ₹130 Crore Pending Bills
sakal
उ. सोलापूर: वर्षभर ऊस लेकरावानी जपणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातील महिलांनाही अखेर रस्त्यावर उतरावे लागले. थकीत ऊसबिलासाठी सोलापुरात सुरू असलेल्या आंदोलनात महिला शेतकऱ्यांनाही जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर रात्र काढावी लागली. कारखान्यात ऊस घातल्यानंतर हातात एक रुपयाही नाही. हजारो शेतकऱ्यांची तब्बल १३० कोटी रुपयांची रक्कम थकवून गोकुळ शुगर कारखाना चालवणारा मोकळा फिरत असताना, न्याय मागण्यासाठी तब्बल २०० शेतकऱ्यांना शेती, संसार आणि घराचा उंबरठा सोडून शहरात रस्त्यावर रात्र काढावी लागली. ना अंथरूण, ना पांघरूण, ना सुविधा. त्यातच पोलिसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मंगळवारी आंदोलन चिघळले आणि संतप्त शेतकरी थेट मुख्य रस्त्यावर येऊन बसले.