
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर ते गोवा (शक्तिपीठ) महामार्गाला पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मंगळवारी (ता. 8) विटे (ता. पंढरपूर) येथील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना जमीन मोजणी न करता परतावे लागले.