

Shiv Sena activists and farmers continue hunger strike in Sangola demanding sugarcane price hike.
Sakal
महूद: धाराशिव साखर कारखाना संचलित वाकी-शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चारने ऊस बिलाचा पहिला हप्ता तीन हजार रुपये द्यावा अशी मागणी आहे. यासाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी गुरुवारी रास्ता रोको तर शुक्रवारी कारखाना बंद करण्याचा इशारा दिला आहे.