
मंगळवेढा : पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना दोन वारकऱ्यांना टेम्पोने जोराची धडक दिली. यात एक वारकरी ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. बंदाप्पा म्हाळाप्पा कांबळे (वय ६२, रा.शिवणगी) असे मृताचे नाव आहे. तर विठ्ठल ऐवळे हे गंभीर जखमी झाले आहेत.