

Andur Accident Horror
Sakal
उ. सोलापूर-अणदूर: नवस फेडण्यासाठी अणदूर येथील खंडोबाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला ठार झाल्या. चालकासह इतर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची परिस्थिती चिंताजनक आहे. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात घडला.