
सोलापूर: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कुलाली-दुधनी येथे रेल्वेच्या ओएचई पॉवर ब्लॉकदरम्यान काम करताना इलेक्ट्रिक (टीआरडी) विभागातील टेक्निशियन मनोजकुमार यादव (वय ३५, रा. अक्कलकोट) यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १७) घडली. मनोजकुमार यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अक्कलकोटजवळ नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.