सोलापूर : अनगर- अंजनगाव रस्त्यावर अपघात पिता-पुत्राचा मृत्यु

दोघांच्या अंगावरून ट्रॅक्टर जाऊन झालेल्या अपघातात दोघा पिता पुत्रांचा जागीच मृत्यू
Accident
AccidentSakal

मोहोळ : मोटर सायकलची धडक बसून दोघांच्या अंगावरून ट्रॅक्टर(Tractor) जाऊन झालेल्या अपघातात (Accident)दोघा पिता पुत्रांचा (Father and Son)जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता अनगर ते अंजनगाव रस्त्यावर झाली. राहुल संजय गडेकर वय 15, संजय ज्ञानदेव गडेकर वय 45 दोघे राहणार अंजनगाव अशी मृतांची नावे आहेत.

Accident
सोलापूर : तांबोळे खत कारखाना कामगार 'विष'बाधा प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत संजय व राहुल गडेकर हे पिता-पुत्र अनगर येथुन काम आटोपून मोटरसायकल वरून अंजनगाव च्या दिशेने निघाले होते. समोरून येणाऱ्या मोटरसायकलने गडेकर पिता-पुत्राच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. धडक बसताच ते दोघे ही रस्त्यावर खाली पडले. राहुल च्या पायाला व डोक्याला जोरदार मार लागला. त्याचवेळी पाठीमागून ट्रॅक्टर येत होता, सदरचा ट्रॅक्टर हा दोघांच्याही अंगावरून गेल्याने गडेकर पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून ,अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com