Heartbreaking scene near Nagzhari River where a father drowned while rescuing his son; local rescue teams at the spot.
Sakal
सोलापूर
Drowning Death: 'मुलाला वाचविताना वडिलांचा बुडून मृत्यू'; नागझरी नदीतील दुर्घटना; मुलगा गंभीर, नेमकं काय घडलं..
Nagzhari River Mishap Claims Father’s Life: सोलापुरातील कल्याणनगर येथील रहिवासी डेव्हिड (अरुण) सतीश बनसोडे (वय ४२) हे पत्नी, मुलांसोबत रविवारी सकाळी वैराग येथे आले होते. वैरागहून धामणगावला जात असताना धामणगाव येथे नागझरी नदीवर बंधारा आहे.
वैराग : धामणगाव (ता. बार्शी) येथील नागझरी नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात ११ वर्षांचा मुलगा तोल जाऊन पडला. त्याला बुडताना वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. दरम्यान, मुलावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत गंभीर आहे.

