बाप दोन वर्षापासून मुलीला उठवायचा आणि तोंड दाबून...

crime solapur.jpg
crime solapur.jpg

माढा (सोलापूर) : जन्मदात्या वडिलाने आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.
दरम्यान अल्पवयिन पिडीत मुलीच्या आईने माढा पोलिसांत त्याच्या पतीच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानुसार त्यांच्या विरोधात बलात्कार व पाॅक्सो कलमा तंर्गत सोमवारी रात्री उशीरा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटल्या नुसार,गत दोन वर्षापासुन पती माझ्या मुलीवर दुष्कर्म करीत आला असल्याचे नमुद करीत २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्ही घरी नसताना व आम्ही रात्री झोपल्यानंतर माझ्या मुलीला उठवुन तोंड दाबुन वेळोवेळी तिचे बरोबर दुष्कर्म केले.आम्हाला कोणाला काही बोललात तर तुम्हाला जिवंत ठेवणार अशी ही धमकी देत आले असल्याचे म्ह्टले आहे.दरम्यान माढा पोलिसांनी त्या पित्याला अटक करुन ताब्यात घेतले आहे.

पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रकिया सुरु आहे. नाते संबधातच असलेली ही घटना पोलिसांत दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे हे अधिक तपास करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com