माळशिरसचे मुख्याधिकारी वडजे 'अँटी कनप्शन'च्या जाळ्यात! गुन्हा दाखल | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe
माळशिरसचे मुख्याधिकारी वडजे 'अँटी कनप्शन'च्या जाळ्यात! गुन्हा दाखल

माळशिरसचे मुख्याधिकारी वडजे 'अँटी कनप्शन'च्या जाळ्यात! गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : येथील माळशिरस (Malshiras) नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे (Dr. Digambar Wadje) यांच्या विरुद्ध एक लाख 26 हजार रुपयांची लाच (Bribe) मागितल्याचा गुन्हा दाखल झाला असून, सांगली (Sangli) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) आज (बुधवारी) कारवाई केली आहे.

हेही वाचा: माय-लेकीच्या खून प्रकरणात संशयित आरोपी पतीला अटक!

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डॉ. विश्वनाथ वडजे हे माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून तक्रारदार यांनी माळशिरस येथील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचे बिलाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्‍शन यांच्या खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम मागितली होती. त्याबाबत 30 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्यूरो सांगली यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 सप्टेंबर ते 22 ऑक्‍टोबर रोजी ब्यूरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता, कारवाईमध्ये मुख्याधिकारी वडजे यांच्याकडे चेक जमा केलेल्या बदल्यात एक लाख रुपये व नवीन काम मिळवून देण्यासाठी 26 हजार असे एकूण 1 लाख 26 हजार रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर 22 ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी वडजे याच्या विरुद्ध सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्याधिकारी वडजे यांनी संशय आल्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही. विश्वनाथ वडजे यांच्या विरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलिस उपायुक्त सूरज गुरव, सुहास नाडगोडा, उपअधीक्षक सुजय घाडगे, अँटी करप्शन ब्यूरो सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, संजय कलगुडगी, बाळासाहेब पवार यांनी प्रत्यक्ष येऊन कारवाई केली आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

डॉ. विश्वनाथ वडजे यांच्याविषयी माळशिरस शहरात अनेक कार्यकर्त्यांचा नाराजीचा सुरू होताच, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. या कारवाईमुळे नगरपंचायतीचा कारभार व्यवस्थित चालेल, असेही नागरिक बोलत आहेत.

loading image
go to top