esakal | माजी महापौर सपाटेंविरुद्ध "या' कारणामुळे फसवणुकीचा गुन्हा!
sakal

बोलून बातमी शोधा

माजी महापौर सपाटेंविरुद्ध "या' कारणाने फसवणुकीचा गुन्हा!

माजी महापौर सपाटेंविरुद्ध 'या' कारणामुळे फसवणुकीचा गुन्हा!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

सोलापूर : महापौरपदी असताना मनोहर सपाटे (former mayor Manohar Sapate) यांनी एका संस्थेची जागा बनावट कागदपत्रे करून स्वत:च्या ताब्यात घेतली. पदाचा गैरवापर करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केली, अशी फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी सदर बझार पोलिसांत दिली. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयानेही गुन्हा दाखल करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सोपविण्यात आला आहे. (Filed a case of fraud against former mayor Manohar Sapate-ssd73)

हेही वाचा: सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

सपाटे यांनी 1993-94 मध्ये महापौर असताना अभिषेक नगर, मुरारजी पेठेतील टीपी-चार, फायनल प्लॉट क्र.106 वरील सात हजार 863 चौरस मीटर जागा खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली. तत्पूर्वी, त्यांनी या जमिनीसाठी शासकीय किमतीच्या 50 टक्‍के रक्‍कम भरल्याचेही खोटे दाखविले. जागेच्या खरेदीसाठी कागदपत्रे तयार करताना त्या संस्थेचे सदस्य नसतानाही खरेदी खतावर संस्थेचे सचिव म्हणून लता सुदाम जाधव यांची स्वाक्षरी घेतली. त्यावेळी सपाटे यांनी पदाचा गैरवापर केला, असेही फिर्यादीचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, फिर्यादीने या प्रकरणी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा

27 वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी

मनोहर सपाटे हे महापौर असताना त्यांनी ही जागा बेकायदेशीरपणे बळकावल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे या करीत आहेत. गुन्ह्याचा सखोल तपास करताना 27 वर्षांपूर्वी झालेल्या त्या व्यवहारातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यादरम्यान, सपाटे यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे मुसळे यांनी या वेळी सांगितले.

loading image