

Citizens paying heartfelt tribute to Pannalal Surana during his final farewell ceremony.
Sakal
सोलापूर :अमर रहे, अमर रहे अशा घोषणासह खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या राष्ट्र सेवा दलाच्या प्रार्थनेसह अश्रुचिंब भावनांनी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. मंगळवारी (ता. २) रात्री नळदुर्ग येथे आपलं घर संस्थेत निधन झाल्यानंतर आज सकाळी वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान झाले.