esakal | अखेर सांगोला साखर कारखान्याचे धुराडे यंदा पेटणार! "धाराशिव'ने घेतला भाडेतत्त्वावर
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर सांगोला साखर कारखान्याचे धुराडे यंदा पेटणार! "धाराशिव'ने घेतला भाडेतत्त्वावर

गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

अखेर सांगोला साखर कारखान्याचे धुराडे यंदा पेटणार!

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना (Sangola Taluka Shetkari Sahakari Sakhar Karkhana) अखेर येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील (Deepak Salunkhe-Patil) यांनी दिली. धाराशिव साखर कारखाना प्रा. लि.चे (Dharashiv Sugar Factory) प्रमुख अभिजित पाटील (Abhijit Patil) आणि सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्यात भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा करार झाल्याने येत्या गळीत हंगामापासून कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याचे धुराडे अखेर यंदा पेटणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीत झालेत कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच उदंड! काळेंचा घरचा आहेर

गेल्या दोन वर्षांत नीरा उजवा कालवा, टेंभू योजना, म्हैसाळ योजना, तसेच सांगोला शाखा कालवा या सिंचन योजनांचे पाणी सांगोला तालुक्‍याच्या चोहोबाजूंनी फिरल्याने तालुक्‍यात उसाची लागवड प्रचंड प्रमाणात झाली आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन दीपक साळुंखे- पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगोला कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली होती. यानुसार मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, सर्व संचालक मंडळ, धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकचे (शिखर बॅंक) अध्यक्ष अनासकर यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे सर्वानुमते ठरले.

हेही वाचा: भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात कधी मिळणार?

चालू हंगामापासून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार

गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे हे चौथे युनिट आहे. कारखान्याचे अध्ययक्ष दीपक साळुंखे-पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून येत्या गळीत हंगामापासून सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने सुरू करणार आहोत

- अभिजित पाटील, प्रमुख, धाराशिव साखर कारखाना

loading image
go to top