esakal | राष्ट्रवादीत झालेत कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच उदंड! काळेंचा घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीत झाले कार्यकर्त्यांपेक्षा नेते उदंड! कल्याणराव काळेंचा घरचा आहेर

आचारी जास्त झाल्यानंतर जसा स्वयंपाक बिघडतो, तशीच अवस्था पंढरपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची झाली आहे, असा घरचा आहेर कल्याणराव काळे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीत झालेत कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच उदंड! काळेंचा घरचा आहेर

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आचारी जास्त झाल्यानंतर जसा स्वयंपाक बिघडतो, तशीच अवस्था पंढरपुरातील (Pandharpur) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (NCP) झाली आहे, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला आहे. परिचारक (Paricharak) हे आमचे विरोधक असतानाही आपलेच लोक आमची मापे काढतात, अशी खंतही काळे यांनी व्यक्त केली. काळेंच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आणखी उफाळून येण्याची शक्ता आहे. तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी कासेगाव (Kasegaon) येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना कल्याणराव काळे यांनी पक्षात सुरू असलेल्या गटबाजीविषयी नाराजी व्यक्त करत "पक्षातील कार्यकर्ते आमची मापे काढतात' अशी उघड नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात कधी मिळणार?

या वेळी काळे म्हणाले, आमचे विरोधक हे परिचारक व त्यांची कंपनी आहे. परंतु त्यांच्यावर कोणी टीका करत नाहीत. आपलेच लोक आमची मापे काढून आमच्यावर सीसीटीव्हीप्रमाणे पाळत ठेवतात. दुष्काळामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवणार नाही. फक्त विठ्ठल आणि वसंतराव काळे या दोनच साखर कारखान्यांविषयी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. परिचारकांच्या कारखान्याविषयी लोक चर्चा करत नाहीत. आम्हालाच केवळ टार्गेट केले जात आहे. यामध्ये राष्ट्रवादीचेच लोक आघाडीवर आहेत. आमच्या बायका पण आमच्यावर जेवढं लक्ष देत नसतील तेवढं लक्ष आमच्यावर ठेवले जात आहे. हे आपलेच लोक करतात. सध्या पक्षात नेते कमी आणि कारभारी जास्त झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा: कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

आम्ही साखर कारखान्यांची विस्तारवाढ केली, त्यामुळेच आमचे कारखाने अचडणीत आल्याचा अजब दावा देखील काळे यांनी या वेळी केला. काळे यांनी जाहीर भाषणात पक्षातील पदाधिकाऱ्यांवर उघड टीकाटिप्पणी केल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आणखी उफाळून आला आहे. काळे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचा दुसरा गट काय उत्तर देणार, याकडेच लक्ष लागले आहे.

loading image
go to top