Mangalwedha News : अखेर 697 कोटीच्या मंगळवेढा उपसा योजनेस कॅबिनेटची मंजूरी

सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या 697 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Mangalwedha
Mangalwedhasakal

मंगळवेढा - सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या 697 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्व आ. भारत भालके यांनी प्रयत्न केलेल्या या उपसा सिंचन योजनेवर आज आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने शिक्कामोर्तब झाल्याने या योजनेचा लाभ तालुक्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपासून तालुक्याच्या राजकीय पटलावर गाजणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी स्व. आ. भारत भालके यांनी प्रयत्न करून 2014 ला 495 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली. सत्ता बदलाने या योजनेचे पुर्नसर्वेक्षण सर्वेक्षण केल्यानंतर पाणी आणि गावे कमी करण्यात आली.

तत्कालीन खा. शरद बनसोडे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाणी आणि गावे पूर्वत करून या योजनेचे फेर सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडे यांना आमदार करा मी प्रश्न मार्गी लावतो असा शब्द दिला होता.

आ. समाधान आवताडे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सर्वे करून प्रस्ताव सादर केला. 9 सप्टेंबर 2023 ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आ. समाधान आवताडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून या योजनेचा प्रस्तावावर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांची सही घेतल्यानंतर अंतीम मंजूरीसाठी कॅबिनेटची प्रतीक्षा लागून राहिली.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.प्रणिती शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला व नुकताच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी 32 गावाचा दौरा देखील केला. तर 24 गावातील सरपंचांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे मुंबई येथे भेट घेत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली तर पाणी संघर्ष समितीच्या वतीने पाठकळ व निंबोणी येथे बैठक घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार व कर्नाटकात जाण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

शिवाय लोकसभा निवडणुकीत पाण्यावरून मोठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असतानाच अखेरीस आज या योजनेला कॅबिनेटची मान्यता मिळाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची अडीच वर्षांनंतर आता पूर्तता झाली.निधी उपलब्ध होताच या कामास सुरूवात होणार आहे.

आ. समाधान आवताडे यांनी यासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्यामुळे सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत फायदा होणार आहे दरम्यान मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मंगळवेढ्यात आ.अवताडे समर्थकाने जल्लोष साजरा करत पेढे वाटले.

यासाठी स्व.भारत भालके,आ.समाधान आवताडे,आ.प्रणिती शिंदे,माजी खा.शरद बनसोडे,सुशिलकुमार शिंदे,प्रशांत परिचारक,भगीरथ भालके,अभिजित पाटील,शैला गोडसे,प्रशांत साळे,अनिल सावंत,रामेश्वर मासाळ,दत्तात्रय खडतरे,अॅड राहूल घुले,विविध संघटना व पाणी चळवळीचे कार्यकर्तेनी पत्रव्यवहार,आंदोलन,याचिका आदी माध्यमातून प्रयत्न केले.

या योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, नंदेश्वर, गोणेवाडी, जुनोनी, खडकी, पाटखळ, मेटकरवाडी, भोसे, रड्डे, सिद्धनकेरी, निंबोणी, जित्ती, खवे, यड्राव, शिरशी, भाळवणी, जालिहाळ, हाजापूर, हिवरगाव, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे.

भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 95 किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक 2.04 अघफु (५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे 24 गावातील 17,186 हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com