esakal | अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द ! जलसंपदा विभागाचा लेखी आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani Dam

उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍यासाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश आज (गुरुवारी) जलसंपदा विभागाने रद्द केला आहे.

अखेर उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द ! जलसंपदा विभागाचा लेखी आदेश

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : उजनी धरणातून (Ujani Dam) इंदापूर तालुक्‍यासाठी (Indapur Taluka) मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश आज (गुरुवारी) जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) रद्द केला आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले (Vaijnath Chille, Deputy Secretary, Water Resources Department) यांनी हा आदेश रद्द केल्याचे लेखी पत्र दिले आहे. (Finally, the decision to supply water to Indapur from Ujani dam was canceled)

हेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित

उजनी धरणातून इंदापूरला पाणी वळवण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. विविध शेतकरी संघटनांसह पाणी संघर्ष समितीने सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. काल (बुधवारी) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गोविंद बागेतील निवास स्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आज (गुरुवारी) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांना अजितदादांच्या बैठकीची धास्ती! पहाटेपर्यंत जागून तयार केला कोरोना रिपोर्ट

यादरम्यान जलसंपदा विभागाने इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचा लेखी आदेश दिला आहे. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाचे आंदोलक व शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

या आंदोलनामध्ये रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, पाणी संघर्ष संघर्ष समितीचे प्रमुख अतुल खुपसे, माऊली हळणवर, प्रभाकर देशमुख हे सहभागी झाले होते.