esakal | जिल्हाधिकाऱ्यांना अजितदादांच्या बैठकीची धास्ती ! पहाटेपर्यंत जागून तयार केला कोरोना रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एका बैठकीत "जो अधिकारी काम करीत नाही, पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही अशांचा ठराव करून आम्हाला पाठवा; त्यांची तत्काळ बदली करतो', असे स्पष्टपणे सांगितले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना अजितदादांच्या बैठकीची धास्ती! पहाटेपर्यंत जागून तयार केला कोरोना रिपोर्ट

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोरोना (Covid-19) कमी होत असतानाच ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूदरही चिंताजनक बनत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मंगळवारी (ता. 25) संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी नऊ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कारणांचा शोध घेतला. तत्पूर्वी, या बैठकीची तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) पहाटे दोन वाजेपर्यंत जागे राहिले आणि त्यांनी या बैठकीचा अहवाल तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (The Corona Report was prepared by the District Collector on the pretext of Ajit Pawar's meeting)

हेही वाचा: खत विक्रेत्यांना दणका ! जिल्ह्यातील 12 खत दुकानांचा परवाना निलंबित

रोखठोक, दणकेबाज बोलणे आणि धडक कारवाईत पटाईत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनावर दरारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बैठकीत महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी जो अधिकारी काम करीत नाही, पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही अशांचा ठराव करून आम्हाला पाठवा; त्यांची तत्काळ बदली करतो, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार महापौरांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांची बदली करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अजित पवारांच्या बैठकीची धास्ती घेतली होती, अशी चर्चा आहे. बैठकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मृत्यूदर व रुग्णवाढीची माहिती संकलित करून त्याच्या कारणांची यादी बनविली. पहाटे दोन वाजता त्या अधिकाऱ्यांना सोडले आणि जिल्हाधिकारी घरी गेले, असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: जिल्ह्यातील "या' 137 गावांनी उडवली प्रशासनाची झोप !

तुम्ही काहीही मागितलं तर देईन, पण कोरोना आटोक्‍यात आणा

कोरोना रुग्णांची संख्या कमी न झालेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी झाली, परंतु मृत्यूदर अजूनही चिंताजनकच आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात रुग्णांबरोबरच मृत्यूदरही लक्षणीय आहे. या पार्श्‍वभूमीवर बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना जे हवे आहे ते देईन, पण काहीही करून मृत्यूदर व रुग्णसंख्या आटोक्‍यात आणा. आता पुढे काही दिवसांत पुन्हा आढावा बैठक होणार आहे. तत्पूर्वी, रुग्ण व मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.