
Relief amount credited to Solapur farmers’ bank accounts under government compensation scheme.
Sakal
सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्यांना शासनाच्यावतीने प्रतिकुटुंब १० हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यास सुरुवात झाली आहे. बाधितांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाऊ लागली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि करमाळा तालुक्यातील बाधितांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. माढा आणि मंद्रूप अपर तहसीलच्या कार्यक्षेत्रातील बाधितांच्या खात्यावर उद्या (गुरुवार, ता. २) व शुक्रवारी (ता. ३) ही रक्कम जमा होणार आहे.