

Government aid credited to 4 lakh farmers in Solapur district; questions raised over delay for remaining 47% beneficiaries.
Sakal
सोलापूर: सप्टेंबरमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना भरपाईपोटी राज्य शासनाकडून तीन हेक्टरच्या मर्यादेत ९४९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. एकूण बाधितांपैकी ५३ टक्के म्हणजेच चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत जमा करण्यात आली आहे. ४७ टक्के शेतकऱ्यांना भरपाईसाठी महसूल यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत असून कर्मचारी रात्रीही कार्यालयात संगणकासमोर दिसत आहेत.