Solapur Corporation : महापालिका गाळ्यांच्या भाडेपट्ट्याचे लवकरच नूतनीकरण

नागरिकांच्या तक्रारी अन्‌ विभागाच्या फेरचौकशीचे सीईओ आव्हाळे यांचे आदेश
Solapur Corporation
Solapur Corporationsakal

सोलापूर : जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाच्या कारभाराबद्दलच्या अनेक तक्रारी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व वित्त व लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्या माध्यमातून समाजकल्याण विभागातील कामकाजाची सखोल चौकशी केली जाणार आहे. तत्पूर्वी, आंतरजातीय विवाह केलेल्या ५० लाभार्थींना दोनदा अनुदान वाटप झाले कसे, याची चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल सीईओंना सादर झाला आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पण, दीडशेहून अधिक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत असतानाही ५० लाभार्थींना या विभागाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान वितरित झाले. सुरवातीला समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी बॅंकेची चूक असल्याचे सांगितले, पण बॅंकेने दोन पानांचा खुलासा देत आमची काहीच चूक नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांमार्फत या प्रकाराची सखोल चौकशी झाली. दोनदा अनुदान वितरित झाले इथपर्यंत ठिक होते, पण ही बाब सहा महिन्यांनी निदर्शनास आली हे गंभीर आहे.

Solapur Corporation
Solapur Zillaparishad : गुणवंत कर्मचाऱ्यासाठी चार प्रस्ताव प्राप्त

चौकशी अहवाल समाजकल्याण आयुक्तांकडे जाणार

आंतरजातीय विवाह अनुदानातील हलगर्जीपणाचा अहवाल जिल्हा परिषदेकडून आता समाजकल्याण आयुक्तांना पाठविला जाणार आहे. तत्पूर्वी, सामान्य प्रशासन व वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या फेरचौकशीचा अहवाल देखील त्यासोबत आयुक्तांना सादर होईल. मंगळवारपासून समाजकल्याण विभागातील आस्थापनासंबंधीच्या फायलींची चौकशी सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील या करतील. तर विविध योजनांसाठी वितरित झालेला निधी, लाभार्थी अशा आर्थिक बाबींची पडताळणी वित्त व लेखा अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com