esakal | निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला आमदार प्रशांत परिचारकांनी दिला खांदा
sakal

बोलून बातमी शोधा

निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला आमदार प्रशांत परिचारकांनी दिला खांदा

आमदार प्रशांत परिचारकांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रति दाखवलेल्या निष्ठेमुळे नेता आणि कार्यकर्त्यांमधील नाते किती घट्ट असतं हेच या प्रसंगातून अधोरेखित झाले आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला आमदार परिचारकांनी दिला खांदा

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर (Solapur जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात परिचारक कुटुंबाचे (Paricaharak Family) नाव आजही आदराने घेतले जाते. स्व. सुधाकर परिचारक (Sudhakar Paricharak) यांच्या मुशीत अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण झाली. परिचारकांनी कधीही कार्यकर्त्यांची जात, पात आणि धर्म न पाहता केवळ राजकारणातील तत्त्वनिष्ठा आणि चारित्र्य या दोनच निकषांवर पारख करून त्यांना राजकाणात काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या कसोटीवर अनेक कार्यकर्ते यशस्वी देखील झाले. त्यापैकीच स्व. सुधाकर परिचारकांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरेश आगावणे यांचे शुक्रवारी (ता. 3) अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याची अंत्ययात्रा निघताच भाजप आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या अत्यंयात्रेत खांदा दिला. आमदार प्रशांत परिचारकांनी, आपल्या कार्यकर्त्यांप्रति दाखवलेल्या निष्ठेमुळे नेता आणि कार्यकर्त्यांमधील नाते किती घट्ट असतं हेच या प्रसंगातून अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा: राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेचा 'या' दिवशी निकाल! 2019 चा निकाल लांबला

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सुरेश आगावणे यांचे शुक्रवारी निधन झाले. सुरेश आगावणे हे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून देखील काम पाहिले आहे. सुरेश आगावणे यांची स्व. सुधाकर परिचारक व आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर कार्यकर्ते अशी जिल्ह्यात ओळख होती. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांनी परिचारकांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच काम केले.

हेही वाचा: 'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक

अलीकडेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पंढरपूरसह परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी धाव घेतली. या वेळी आमदार प्रशांत परिचारकांनी तर आपल्या निष्ठवंत कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेला खांदा देवून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटल्याचे दिसून आले. एका सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्याच्या अत्यंयात्रेत नेत्याने खांदा देण्याची बहुदा परिसरातील पहिलीच घटना असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.

loading image
go to top