
Chemical Factory Fire Brought Under Control After 24 Hours; 30 Fire Tenders Used
Sakal
उ. सोलापूर : चिंचोली या औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला शुक्रवारी (ता. ३) लागलेली भीषण आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास जवळपास २४ तास लागले. शनिवारी (ता. ४) दुपारी तीनपर्यंत आग शमविण्याचे काम सुरू होते. यासाठी ३० पाण्याचे बंब वापरण्यात आले. त्याचबरोबर आग शमवण्यासाठी अग्निशामक रसायनाचाही वापर करण्यात आला. शुक्रवारी दुपारी चार वाजता लागलेल्या आगीमध्ये एल अँड जी तुळजा असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड ही रसायन प्रक्रिया कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली; मात्र अद्याप या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.