ऑनलाइन सायकलिंग राईडद्वारे साडेचार हजार किलोमीटरचा फिटनेस प्रवास 

cycling.jpg
cycling.jpg
Updated on

सोलापूरः कोरोना संकटामुळे सामुहिक सायकलिंग स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी सायकलप्रेमी रायडर स्वतःच्या प्रॅक्‍टिसच्या माध्यमातून सायकलींगला कायम जोडले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन सायकल राईड चे 5 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सायकलपटूंनी तब्बल 4 हजार 545 किमीचा प्रवास नोंदवला. 

सदर संकल्पनेमध्ये सायकलस्वार हा आपल्या शिक्षकाप्रती प्रेम व आदर म्हणून स्वतः ही राईड आपल्या आवडत्या शिक्षकाला अर्पित करून शिक्षक दिन साजरा करण्याचे नियोजन होते, सहभागी सायकलपटूना ई-सर्टिफिकेट चे वितरण करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नागरिक जवळपास सहा महिने लॉकडाऊन मुळे घरी अडकून होते. अनलॉक काळात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे शिक्षक दिनानिमित्त सदर सायकल राइड चे आयोजन केले होते. 

या उपक्रमात जवळपास 144 सायकलपटू यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला असून त्यामध्ये 43 महिला सायकस्वारांचा सहभाग होता. या उपक्रमास सोलापूर, पुुणे,अकोला,औरंगाबाद, अशा विविध शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा वाढता प्रतिसाद आणि होणारी मागणी पाहता लवकरच पुढील ऑनलाईन राईडचे नियोजन आखण्यात येईल, असे सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर चे अध्यक्ष प्रा.सारंग तारे यांनी सांगितले. सदर उपक्रमामध्ये भाऊराव भोसले, शितल कोठारी, अनुजा तारे, श्रध्दा सक्करगी, रजनीकांत जाधव, चेतन लिगाडे यांचे सहकार्य लाभले. येणाऱ्या काळात होणाऱ्या, दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाईन राईडचा उपक्रम लवकरच आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी मो. क्र. 9975924942 व मो.क्र. 9049659222 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे करण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com