“Collector Kumar Ashirwad inspecting submerged barrages in Mohol taluka after heavy rains.”
Sakal
सोलापूर
Solapur News: 'मोहोळ तालुक्यातील पाच बंधारे पाण्याखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पाहणी'; तात्काळ पंचनामाचे आदेश
Mohol Taluka Barrages Flooded: गेल्या आठवड्यापासून मोहोळ तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काढणीस आलेली व शेतात काढून पडलेली उडीद, सोयाबीन, कांदा, मका ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यात एकूण 14 बंधारे आहेत.
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीत सिना- कोळगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सीना नदीला पूर आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील व या नदीवर असलेल्या आष्टे- कोळेगाव बंधाऱ्याला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली,त्यांनी तात्काळ बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.