
सोलापूर : जुळे सोलापुरात केवळ पाच मिनिटे पाऊस झाल्यानंतर मजरेवाडी भागात तब्बल पाच तास वीजपुरवठा खंडित झाला. पहाटे दोन वाजेपर्यंत वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. काही महिन्यांपासून मजरेवाडी भागात महालक्ष्मीनगर, गिरिजा मंगल कार्यालयाचा मागील भाग, जगदंबा नगर, विराट नगर, ए. जी. पाटील नगर, श्रीशैल नगर आदी वसाहतींमध्ये वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. अगदी थोडे वारे सुटले तरी वीज पुरवठा खंडित होतो.