
सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सद्यस्थितीत पाच हजार ११ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांच्यावर त्यांच्याच घरी उपचार सुरु आहेत. शहरातील दोन हजार २०७ पैकी ९४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ग्रामीणमधील दोन हजार ८०४ रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण त्यांच्या घरी राहून उपचार घेत आहेत.
कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. ग्रामीणमधील एक हजार ६३१ संशयितांमध्ये रविवारी (ता. ३०) २९३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बहुतेक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील अधिकजण प्रतिबंधित लस घेतलेलेच आहेत. दुसरीकडे शहरातील एक हजार १०७ संशयितांमध्ये ८० व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत. शहरातील दाराशा, रामवाडी व सोरेगाव नागरी आरोग्य केंद्राअंतर्गत चाचणी केलेल्यांमध्ये सर्वाधिक बाधित आहेत. ग्रामीणमधील पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ६७, बार्शी तालुक्यात ४९ तर माळशिरस तालुक्यात ४८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे उत्तर व, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यातील संसर्ग कमी होऊ लागला आहे. रविवारी एकही रुग्ण कोरोनाचा बळी ठरलेला नाही.
म्युकरमायकोसिसपासून दिलासा
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांची संख्या ७०६ झाली आहे. त्यातील १०७ रुग्ण दगावले, परंतु ६०९ रुग्णांनी त्या गंभीर जीवघेण्या आजारावर मात केली. शहर-ग्रामीणमधील ३५ रुग्णालयांमधून त्यांच्यावर उपचार झाले. सद्यस्थितीत तीन रुग्ण उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांत या आजाराचे रुग्ण वाढलेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.