
सोलापूर : झेंडा फडकावण्याच्या कारणावरून शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास यत्नाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे दोन गटांत हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले. सातलिंगप्पा अंबण्णा अंबलगी (वय ४४) व राधाकृष्ण गेनसिद्ध बंडगर (वय ३०, दोघे रा. यत्नाळ) असे जखमीचे नाव आहे.