
Aircraft delayed landing at Solapur airport due to cloudy weather, circled in the sky for 20 minutes.
Sakal
सोलापूर: गोव्याहून आलेले विमान सोमवारी सकाळी २० मिनिटे उशिराने लॅंडिंग झाले. विमान वेळेत लॅंडिंग होत नसल्याने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली होती. ढगाळ वातावरणामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज येत नव्हता. यामुळे विमान २० मिनिटे हवेतच घिरट्या घालत होते. ढग गेल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.