

Flocks of Blue-Tailed Bee-Eaters seen hovering near Budhehal Lake — a treat for birdwatchers and photographers this winter.
Sakal
सांगोला : सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव परिसर पुन्हा एकदा पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तलाव परिसरात ब्ल्यू-टेल्ड बी ईटर म्हणजेच निळ्या शेपटीचा माशीमार (Merops philippinus) या दुर्मिळ हिवाळी परदेशी पक्ष्यांचे थवे दिसू लागले असून, त्यांच्या दर्शनाने पक्षीप्रेमींत उत्साहाचे वातावरण आहे.