

Sina river floods Madha taluka; bandharas underwater, transport routes blocked.
Sakal
माढा: सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील सीना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच माढा-वैराग अर्थात माढा-तुळजापूर ही वाहतूक ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या सर्व गावांमध्ये पूर्वपरिस्थिती निर्माण झालेली आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्तभागाची बुधवारी (ता. १७) पाहणी केली.