
सोलापूर : पाच दिवसांपासून शहर व जिल्ह्यात इतर ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे हिप्परगा तलाव १०० टक्के भरला असून तलावाच्या उजव्या व डाव्या सांडव्यातून ६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तलाव परिसरात असलेल्या १० ते १५ घरांमध्ये पाणी शिरले. सांडव्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे आदीला नदी व देगाव नाल्याला पूर आला. त्याच्या पाण्याने जुना पुना नाका परिसराला वेढा घातला. तर शेळगी नाला ओव्हरफ्लो झाल्याने सोलापूर-तुळजापूर महामार्गावर पाणी आले.