
"Solapur district flooded; railway tracks submerged and ST services disrupted, causing heavy losses."
Sakal
सोलापूर: जिल्ह्यात अद्यापही पूरस्थिती कायम असली, तरी रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या तीन दिवसांत १०१४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच अनेक मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे. याचा एसटी विभागाला सुमारे ३७ लाखांचा फटका बसला आहे.