
Nine-Month Pregnant Woman Evacuated from Flood-Hit Village After Dramatic Effort
Sakal
माढा: माढा तालुक्यातील वाकाव गावातील सीना नदीला आलेल्या पुराने संपूर्ण वाकाव गावाला वेढा घातला. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता पाण्याखाली गेला होता. अशा बिकट परिस्थितीत एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवणे हे खरे तर गावकऱ्यांसाठी मोठे आव्हान होते. नातलग आणि शेजारच्या ग्रामस्थांच्या जिद्दीमुळे अश्विनी खैरे या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला सुखरूप रुग्णालयात पोचविले.