
Mohol Flood
Sakal
मोहोळ : सीना नदीला आलेल्या महापुरा मुळे शेतकऱ्यांच्या शेती, घरे, पिके यांचे नुकसान तर झालेच आहेच, परंतु शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अशा विद्युत महावितरणचे सूमारे 400 ट्रान्सफॉर्मर पाण्यात आहेत. त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उच्चदाब, लघुदाब, वाहिनीच्या तारा, खांब, कनेक्शन बॉक्स यांचा त्यात समावेश आहे. मात्र अशाही परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य वर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गावातील विद्युत पुरवठ्याला प्राधान्य देत 45 गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केल्याची माहिती मोहोळ येथील विद्युत महावितरण चे सहाय्यक अभियंता जी जी पटवेगर यांनी दिली.